माझे कामच माझी ओळख माझी जबाबदारी
काल दिनांक १७ मार्चला रात्री ९ वाजता महागणपती हॉस्पिटलच्या पुढे असलेल्या सिध्दीविनायक हाईट्स ह्या संकुलातुन काही सोसायटी पदाधिकारी, नागरिकांनी फोन केला व कित्येक दिवस KDMC कडुन येणारे पाणी हे अतिशय कमी दाबाने येत असुन त्यामुळे नागरीकांना खुप त्रास होत आहे तेव्हा सकाळी पाणी सोडण्याच्या वेळेला पोहचतो असे सांगुन आज सकाळी ठिक ६.३५ ला सिध्दीविनायक आर्केडच्या इथे वॉल्वमन श्री.पवार यांना बोलावुन नागरीकांच्या समोर असलेल्या परीस्थितीची माहिती घेउन KDMC उप-अभियंता श्री.सूर्यवंशी साहेब यांच्याशी फोनवर बोलुन सिध्दीविनायक आर्केड व नंदन पार्क ह्या दोन्ही संकुलाना असणाऱ्या पाण्याच्या त्रासाबद्दल तात्पुरता मार्ग काढला असुन त्यावर कितपत सहकार्य होत आहे ते बघुन पुढील कार्यवाही करुया असे आश्वासन दिले आणि सद्यस्थितीत गरजेपुरते पाणी मिळेल अशी व्यवस्था झाली आहे.
आपला जनसेवक
श्री.विजय(भाऊ) मारुती देशेकर
७२०८१३६४११

Comments
Post a Comment